
” हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल चित्रपटाचा नाट्यमय ट्रेलर प्रदर्शित “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
हॉलिवूडचा अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं. त्यांची कोर्टातली सुनावणी ही चक्क लाईव्ह दाखवण्यात येत होती. सामान्य लोकांनी यामध्ये चांगलाच रस घेतला आणि बऱ्यापैकी लोकं ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. या सुनावणीदरम्यान दोघांनी एकमेकांवर खूप आरोप केले. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला. या नाट्यमय घटनेवर चित्रपट बनणार असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तेव्हापासूनच जगभरातील प्रेक्षकांच्या मानत या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.