
” ‘तडका’ हा हिंदी चित्रपट लवकरच ‘झी ५’ वर प्रदर्शित होणार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
पाटेकर अभिनीत ‘तडका’ हा हिंदी चित्रपट लवकरच ‘झी५’वर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मिडियावर शेअर करण्यात आलं असून नाना पाटेकर या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
हा चित्रपट ११ वर्षांपूर्वी आलेल्या ‘सॉल्ट अँड पेपर’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. केवळ चित्रपटगृहच नव्हे तर आता ओटीटीवरही दाक्षिणात्य चित्रपट आणि त्यांचे रिमेक बाजी मारताना दिसत आहेत. मूळ मल्याळम चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामध्ये असिफ अली, श्वेता मेनन, लाल अशा कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.
याच्या या हिंदी रिमेकमध्ये नाना पाटेकर यांच्यासह तापसी पन्नू, श्रीया सरन, अली फजल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.