
” ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता – तुषार कालिया “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
जवळपास ३ महिने चाललेल्या ‘खतरों के खिलाडी १२’ या शोने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. नुकतीच या शोच्या १२ व्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आणि हा सीझन तुषार कालियाने जिंकला. तुषारने फैजल शेख आणि मोहित मलिक यांना मात देत ‘खतरों के खिलाडी १२’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
तुषार कालिया हा व्यवसायाने मॉडेल, कोरिओग्राफर, डान्सर आणि स्टेज डायरेक्टर आहे. ३६ वर्षीय तुषार कालिया मूळचा चंदीगढचा आहे. तुषार एक उत्तम डान्सर असून त्याआधी तो ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या सहाव्या आणि सातव्या सीझनमध्ये कोरिओग्राफर म्हणून दिसला आहे. एवढंच नाही तर त्याने काही डान्स रिअलिटी शोचा परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.