
” ‘अक्षयला परत आणा’ असा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
‘हेरा फेरी’ या सुपरहीट चित्रपटाच्या तिसऱ्या भागावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या सीरिजचे दोन्ही भाग आजही प्रेक्षकांचे अत्यंत आवडीचे आहेत. शिवाय या सीरिजमधील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांची जोडी ही प्रेक्षकांना फार आवडली. आता याच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार नसल्याची चर्चा रंगली आहे. नुकतंच अभिनेते परेश रावल यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून याची पुष्टी केली आणि त्यांनंतर सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली आहे.
या तिसऱ्या भागात अक्षय ऐवजी कार्तिक आर्यनला दिसू शकतो अशी चर्चा सध्या होत आहे आणि यामुळे अक्षय कुमारचे आणि ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. ‘अक्षयला परत आणा’ असा ट्रेंडसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय ऐवजी कार्तिक आर्यन या चित्रपटात दिसणार आहे हे जवळपास नक्की झालं आहे. याबाबत ‘बॉलिवूड हंगामा’च्या स्पेशल वृत्तानुसार अक्षय या चित्रपटात न दिसण्यामागचं कारण समोर आलं आहे.