
” माझ्या मागे अनेकजण हात धुवून लागलेत, मला मदत करा – संजय राठोड “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
यवतमाळ
पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड हे सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून त्यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री करण्यात आलं असून ते यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, जनतेची सहानुभूती काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येते.
आमदार संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता मानोरा तालुक्यातील असोला येथे नागरी सत्कार कार्यक्रमात त्यांनी जनतेला विनंती केली की, माझ्मागे अनेकजण हात धुवून लागले आहेत, तुम्ही मला मदत करा. मी यवतमाळ मध्ये गेल्या २५ वर्षांपासून रुग्णांसाठी मदतीचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला मदत करा. तुम्ही जरी मला मतदान करत नाहीत, पण तुमचे नातेवाईक माज्या मतदार संघात राहतात, त्यांना तुम्ही फोन करा. नेहमीप्रमाने यंदाही मला निवडून आणण्यासाठी अशीच मदत राहुद्या, अशी विनंतीच यवतमाळ मधील जनतेला संजय राठोड यांनी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महंत यांनी एकप्रकारे मंत्री संजय राठोड यांना आव्हानच दिले आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचंही त्यांना यंदा आव्हान असणार आहे. त्यामुळे, मंत्री संजय राठोड यांनी केलेली विनंती लोकं ऐकतील का हे पाहण्यासाठी आणखी मोठा काळ जाऊ द्यावा लागणार आहे.