
” नाथजोगी समाजाचा आक्रोश मोर्चा “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अकोला
राष्ट्रीय विमुक्त घुमंतु जनजाती महासंघाच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या संदर्भात नाथजोगी समाजाचा आक्रोश मोर्चा पातुर जि. अकोला येथील तहसिल कार्यालयावर धडकला.
या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष बापुरावजी साबळे, इंजी. नारायण शिंदे, राष्ट्रीय सचिव प्राचाार्य टी. व्ही. राठोड, अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्राचार्य जयसिंग जाधव, कार्यक्रमाचे संयोजक धर्मराज बाबर नाथजोगी समाजाचे समाज बांधव, संघटनेचे पदाधिकारी बहसंख्येने उपस्थीत होते. मा. तहसिलदार साहेबांना प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले.