
” खासगी बसला लागलेल्या आगीमध्ये १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आज पहाटे नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एका खासगी बसला लागलेल्या आगीमध्ये १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे,” असं सांगण्यात आलं आहे. मात्र राज्य सरकारने केलेली मदत ही पुरेशी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पिंपरीमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी हे मत व्यक्त केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
सुत्रानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे जखमीची यादी खालील प्रमाणे :-
1) अमित कुमार
2) सचिन जाधव
3) अश्विनी जाधव
4) अंबादास वाघमारे
5) राजू रघुनाथ जाधव
6) निलेश प्रेमसिंग राठोड
7) भगवान श्रीपत मनोहर
8) संतोष राठोड
9) हंसराज बागुल
10) डॉक्टर अनुपकुमार बाबुलाल शहा
11) त्रिशीला शहा
12) भगवान लक्ष्मण भिसे
13) सिमरन पठाण
14) निकिता राठोड
15) अजय देवगन
16) प्रभादेवी जाधव
17) गणेश लांडगे
18) पूजा गायकवाड
19) आयर्न गायकवाड
20) इस्माईल शेख
21) जैनुबी पठाण
22) पायल शिंदे
23) चेतन मधुकर
24) महादेव मारुती
25) मालुचव्हाण
26) अनिल
27) विवेक शेंडे
28) साहेबराव जाधव