
” मोदीही मला संपवू शकत नाही”, पंकजा मुंडें “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
बीड
“मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही,” असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीही वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही.”