
” रॉजर फेडररने टेनिसला दिला भावपूर्ण निरोप “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
दिग्गज टेनिसपटू आणि टेनिसरसिकांच्या ‘लाडक्या’ रॉजर फेडररने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या लेव्हर चषकातील सामन्यानंतर टेनिसला भावपूर्ण निरोप दिला.
हा सामना फेडररच्या आयुष्यात येऊच नये अशी अनेकांची मनोमन इच्छा होती, पण प्रत्येकच खेळाडूच्या कारकीर्दीत तो दिवस येतोच. २० ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररसाठी हा अखेरचा सामना खूप मोठा होता. टेनिसविश्वातील त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि तितकाच चांगला मित्र राफेल नदालच्या साथीने तो लेव्हर चषक स्पर्धेत दुहेरीतील अखेरची लढत खेळला. आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या फेडररचा टेनिस कोर्टवरील प्रत्येक क्षण चाहते डोळय़ात साठवून ठेवत होते.