♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” चांदणी चौकातील वाहतूक ११ तासांनी पूर्ववत “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

पुणे

चांदणी चौकातील पूल स्फोटकांनी पाडण्यात आल्यानंतर अकरा तासांनी बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सकाळी दहाच्या सुमारास या भागातील वाहतूक पूर्ववत झाली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जुना पूल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवून पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. शनिवारी (१ ऑक्टोबर) बाह्यवळण मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्रीपासून या भागात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. रात्री दहानंतर या भागातील वाहतूक थांबविण्यात आली.

मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी स्फोटकांचा वापर करुन पूल पाडण्यात आला. त्यानंतर या भागातील राडारोडा काढण्यास सुरूवात करण्यात आली. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राडारोडा हटवून बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास राडारोडा हटविण्यात आला. त्यानंतर अकराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129