
“अकोला मानोरा मार्गे आणि राष्ट्रीय महामार्गचे काम रखडले”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई
मानोरा तालुक्यातून सध्या राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे अशा दोन राष्ट्रीय प्रकल्पांची कामे सुरू असून रेल्वे चे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी एक असलेल्या अकोला आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम फक्त वाई गौळ (अमरगड) या गावात अनेक वर्षांपासून रखडलेले असून अर्धवट काम केलेल्या रोडवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावात चिखलामुळे अपघातास सातत्याने आमंत्रण देत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
वाई गौळ (अमरगड) या गावात महान तपस्वी संत काशिनाथ महाराजांचे धार्मिक देवस्थान असून या मंदिरात दर दिवशी असंख्य श्रद्धाळू दर्शनापोटी येत असतात. याच मंदिर परिसरातच निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा असून आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थी, परिसरातील डे स्कॉलर विद्यार्थी, कर्मचारी तथा शिक्षक वृद याच रोड वरुन दररोज येण जाणे करतात. या सर्वांना प्रचंड चिखलमय रस्त्यातून कसरत करत वाट काढावी लागते.
मानोरा तालुक्यात वाई गौळ या गावाच्या मध्यभागातून गेलेला हा विस्तीर्ण महामार्गच केवळ रखडलेला असून यामुळे स्थानिक नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. रस्त्यावरील मोठे खड्डे व चिखलामुळे मोठ्या अपघाताची टांगतु तलवार स्थानिक व बाहेरगावच्या वाटसरूंच्या डोक्यावर टांगलेली असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने तातडीने रखडलेला १६१ ए हा महामार्ग पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने स्थानिक नागरिक बाळगून असलेल्या संयमाच्या उद्रेकाची वाट न पाहता शक्य तेवढ्या लवकर गावाच्या मध्यभागातून गेलेला व रखडलेला महामार्ग त्वरेने पुर्ण करावा. हे काम पूर्ण न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या संतप्त व तीव्र भावना व्यक्त केल्या आहे. या मतदारसंघाती खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनी या रोडच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त करीत आहे.