
“अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, अकोला
प्रहारचे नेते बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण आणि पदयात्रेने महाराष्ट्र ढवळून निघालाय. मात्र, बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्यामूळे पक्ष अडचणीत आलाय.
बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ आणि कुलदीप वसु अध्यक्ष असलेल्या संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती. या बाबत निखिल गावंडे वंचितचे नेते यांनी ज्वारी खरेदीत भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत आली आहे ती म्हणजे ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपामुळे.
यात संत श्री नरसिंग महाराज फार्मर्स प्रोडूसर कंपनीकडे जवळपास ११०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर खरेदी-विक्री संघाकडे १२०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती. शेतकऱ्यांचा ज्वारीचा न केलेल्या सात-बारा (७/१२) वापरायचा. आणि त्या पेरे पत्रकावर फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवायचा.
यात वसू यांच्या कंपनीच्या माध्यमातून अश्या 180 च्या जवळपास शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप होतोय. या बाबत निखिल गावंडे वंचितचे नेते यांनी ज्वारी खरेदीच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत आली आहे ती म्हणजे ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपामुळे.
याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत या घोटाळ्यावर लक्ष वेधलंय आणि त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधान परिषदेत केलीय.
एकीकडे पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी सरकारला धारेवर धरत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील पदाधिकार्यावर फसवणूक केल्याचा आरोप होत असल्याने बच्चू कडूंच्या पक्षाची कोंडी झाली असल्याचे बोललं जात असून दिव्याखालीच अंधार अश्या प्रकारे बाहेर बोलले जात आहे.
ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून पंधराशे ते २००० अशा कमी भावात ज्वारी खरेदी करायची आणि हिच ज्वारी शासनाला ३५०० या हमीभावाने विकायची, अशी ही मोड्स ऑप्रेंडी असल्याचा आरोप होतोय.
काय सांगते आकडेवारी –
तब्बल ५१२७ क्विंटल ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांकडून १५००- २००० रुपये दराने ज्वारीची खरेदी केल्या गेली आणि ती ज्वारी सरकारकडे ३५०० च्या हमीभावापेक्षा विक्री करुन सरळसरळ लाखो रुपयांचा गैरव्यवहार! झाल्याचा आरोप होतोय.