
“मालेगाव जन्मप्रमाणपत्र घोटाळा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मालेगाव
मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.
या प्रकरणाची तपासणी आणि चौकशी करत पोलिस संशयितांना अटक करत आहेत. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विटकरत याबाबतची माहिती दिली.
मालेगांव पोलिसांनी, महापालिका १०४४ जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी फयाज आणि लिपिक वाल्मिक खरे यांना अटक केली आहे.
तसेच संशयित आरोपी सिराज याने खोटे बनावटी कागदपत्रद्वारे जन्मप्रमाणपत्र मिळवले म्हणून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
मालेगावातील आत्तापर्यंत ३९७७ जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून या घोटाळ्या प्रकरणी सुमारे ६० जणांना अटक करण्यात आली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.