
“महागाव येथील विविध समस्यां सोडविण्यासाठी निवेदन“
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
महागाव शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपचे पदाधिकारी यांनी आमदार किसन वानखडे हे महागाव येथील साईनगरच्या वॉल कंपाऊंड च्या उदघाटन प्रसंगी आमदार वानखडे महागाव येथे आले होते. महागाव शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे व घाणीचे साम्राज्य असल्यामुळे पावसाळ्यात साथीचे रोग पसरत आहेत.
त्यावर उपाययोजना करून कचऱ्याच्या ढिकाऱ्याची वेल्लीवाट लावावी तसेच पंतप्रधान आवास योजनेअंत २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आला असून २०१९ पासून घरकुलाचे हप्ते थकीत आहेत. नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे हा निधी वापस गेल्याचा आरोप या निवेदनातून केला आहे. शहरातील नाल्याची सफाई योग्य प्रमाणाने झाली नसल्यामुळे तसेच वार्ड क्रमांक ११ मध्ये कित्येक महिन्यापासून पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा आशयाची निवेदन आमदार वानखडे यांना देण्यात आले असून या प्रसंगी विवेक नरवडे दीपक तायवाडे यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.