♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“गडकरींची शिंदेंच्या आमदाराला तंबी”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

ज्ञानेश्वर चव्हाण, भंडारा

जिल्ह्यात कडक शिस्तीचा अधिकारी नसेल तर आमदारही सुधारणार नाहीत. भंडाऱ्यातील पोलीस अधीक्षकांना टिकवा, नाहीतर मी तुम्हाला सुधारणार, अशी तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिली.

भंडाऱ्यातील बायपास लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित सभेच्या वेळी नितीन गडकरी, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन एका मंचावर असताना गडकरींनी नुरुल हसन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

भंडारा दौऱ्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते ८४ हजार कोटी रुपये किंमतीच्या मौदा- बायपास जंक्शन सहापदरी उड्डानपूलाचे तसेच ७३५ कोटी रुपये किंमतीच्या भंडारा बायपासचे लोकर्पण करण्यात आले.  तसेच भंडारा येथे ११०० कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकर्पण व भूमिपूजन देखील नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.

भंडारा शहरालगत १५ किलोमीटर लांबीच्या बायपास महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी वैनगंगा नदीच्या पुलावर आले असताना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी त्यांना सॅल्यूट केले.  तेवढ्याच तत्परतेने नितीन गडकरी यांनीही त्यांना नमस्ते म्हणाले. गडकरी म्हणाले, नुरुल हसन हे चांगले अधिकारी आहेत. त्यावर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, आम्ही त्यांना सांभाळत आहोत आणि सोबत आहोत.

भोंडेकरांच्या प्रत्युत्तरानंतर नितीन गडकरींनी हसत हसत त्यांना दम भरला की, ‘तुम्ही जर एसपींना सांभाळलं नाही तर आम्ही तुम्हाला सुधारू, कडक शिस्तीचा अधिकारी नसला तर, आमदारही सुधारणार नाहीत.’ तसेच पोलीस अधिक्षकांना टिकवले नाही तर आम्ही तुम्हाला सुधारून टाकू’, असे गडकरी यांनी म्हटले.

नूरुल हसन हे मूळचे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील आहेत. प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. भंडारा येथे कार्यभार स्वीकारल्यापासून, त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय, दारु, सट्टेबाजी, जुगार अड्डे आणि गायींची तस्करी यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे. त्यापूर्वीही वर्धा येथे पोलीस अधीक्षक असताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. दरम्यान या सर्वांमुळे नुरुल हसन मात्र प्रचंड भारावले आणि त्यांनी गडकरींचे आभार मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129