“ पिंपळखुटा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अमर राठोड, दारव्हा
दि. १ जुलै महानायक श्री. वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री नामदार श्री. संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा या गावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजक युवानेते श्री. जगदीश राजू चव्हाण यांनी केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश मामा भोयर चैतन्य स्पोर्ट दारव्हा, डोल्हारी देवी सर्कल मधील सरपंच सुरेश चव्हाण, सरपंच बळीराम माळवे, सरपंच युवराज चव्हाण, सरपंच सौ. सुनंदाताई वाघमारे व उपसरपंच अरुणाताई पवार, डॉ. राम दिलीप चव्हाण, विवेक राजु चव्हाण, अनासाने सर, गायत्री पाठे मॅडम, संजय बोके सर, व गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यामध्ये गणेश मामा भोईर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. संजय बोके सर यांनी महामानव वसंतराव नाईक साहेब यांच्या विषयी मुलांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवानेते श्री. जगदीश चव्हाण यांनी शेवटचे भाषण करून मुलांना आपले विचार व्यक्त करत शिक्षणाचे महत्त्व काय आहे सोप्या भाषेत समजून सांगितले.
या गावातील स्पर्धा परीक्षेत पास झालेले विवेक राजू चव्हाण यांची नागपूर महानगरपालिका मध्ये वृक्ष अधिकारी म्हणून निवड करण्यात आली म्हणून त्यांचे जाहीर सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी म्हणून २३ विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. त्यांना भेटवस्तू म्हणून कॉलेज बॅग व फाईल, गुणवंत प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम व शाळेतील मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील लोकांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिरवे सर यांनी मांडले.
गुणवंत विद्यार्थी :-
- कुणाल देवराव पवार – वर्ग १२ वी मध्ये ७७%
- कु. गौरी दिनेश पाठे वर्ग १० वी मधे ७८.६०%
- कु. शिवानी रामदास चव्हाण
- कु. प्रतिक्षा प्रेमसिंग आडे
- अजय संजय आडे
- कु. खुशी उल्हास राठोड
- कु. शितल बाळू राठोड
- कु. सलोनी देवराव पवार
- कु. सपना देवराव पवार
- चेतन नारायण राठोड
- नमन तुळशीराम चव्हाण
- पृथ्वीराज तुळशीराम चव्हाण
- रणवीर सुनील चव्हाण
- कु. विद्या तुळशीराम वाघमारे
- कु. दिव्या किरण चव्हाण
- कन्हैया साहेबराव चव्हाण
- ओम धारासिंग पवार
- भूषण धनराज चव्हाण
- हितेश विनोद चव्हाण
- साहिल अरविंद चव्हाण
- प्रतिक्षा प्रेमसिंग आडे
- अजय संजय आडे
- कु. खुशी उल्हास राठोड
या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व शेवटी कार्यक्रमाचे समारोप श्रीमती मेघा पाठे मॅडम मुख्याध्यापिका आश्रम शाळा पिंपळखुटा यांनी केले.