
” ‘मिर्झापूर ३’ वर बंदी घालण्यास कोर्टाचा नकार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
बॉलिवूडमध्ये आजवर गुन्हेगारी क्षेत्रावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आहेत. ओटीटी विश्वातदेखील मिर्झापूर या वेबसीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या वेबसीरिजचे दोन सीजन प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही सीजन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. मात्र आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मिर्झापूर’ परतत असल्याच्या वृत्ताने वेबसीरिजचे चाहते खूप खूश आहेत.
या तिसऱ्या सीजनवर बंदी घालण्याची एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. एवढेच नाही तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला अधिक चांगली याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य, भाषा यामुळे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या सीरिजचे प्री-स्क्रीनिंग करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मिर्झापूर येथील एका रहिवाश्याने याचिका दाखल केली होती.