♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” “आमचं गाव आमचा विकास” प्रशिक्षण शिबीर व्यवस्थित रित्या पार “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

दिलीपकुमार चव्हाण, यवतमाळ

राष्टपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, माझ्या भारतातील ७ लाख खेडी स्वयंपूर्ण झाली तरच देशाची प्रगती होईल अशी महात्मा गांधी यांची “ग्राम स्वराज्य” संकल्पना होती. स्वातंत्र्यानंतर गांव पातळीवर जाती पातीचा विचार बळकट होऊन आदर्श संकल्पना उध्वस्त झाली आहे.

ग्रामिण भागात निर्माण झालेली श्रीमंत – गरीबी ची दरी, आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा नंतरही आजही ग्रामीण भागातील सर्वाच्या शेवटच्या घटका पर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहचत नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

योजना आयोगाचे २००९-२०१० चे आकडे सांगतात की ग्रामीण भागात ३७.२ % गरीबी त्यांचे उत्पन्न ९७२/- रुपये व शहरी भागात १४०७/- रुपये प्रती महिना उत्पन्न असलेल्या नागरिकांना दारीद्र रेषेषेखालील आधार मानला आहे. भारतातील २०१७ च्या ऑक्सफँमच्या रिपोर्ट नुसार ७७% राष्ट्रीय संपत्ती १०% लोकांकडे एकवटली आहे. सर्वात श्रीमंत १% नागरीकाकडे ५८% रा्ष्ट्रीय संपत्ती आहे असे या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

ग्रामीण भागातील या सर्व समस्याचा विचार करुन केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने या ग्रामीण भागातील सर्वांगिन विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास मंत्रालयाने “आमचं गाव आमचा विकास” या अभियानाच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांचे मार्गदर्शनासाठी तिन दिवसीय शिबिराचे आयोजन डॉ. श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धामनगांव (देव) ता. दारव्हा येथे आयोजित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास मंत्रालयाने दि. ८ सप्टेंबर २०२२ तसेच दि. ४ नोव्हेंबर २०१५, दि. ६ सप्टेंबर २०१८, दि. १९ मे २०२०, दि. १७ ऑगस्ट २०२० हे काही महत्त्वाचे शासन निर्णय घेउन ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना “आमचं गाव आमचा विकास” या उपक्रमा द्वारे पंचवर्षीय बृहत विकास आराखडा व प्रतेक वर्षाचा वार्षीक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे.

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करतांना गावातील शेतकरी, अनु. जाती, जमाती, महिला, युवक, युवती, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी / कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांशी विविध स्तरांवर विचार विनिमय करावयाचा आहे. या सर्व घटकांच्या सहभागाने प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये तिन दिवसांची लोक सहभागीय नियोजन प्रक्रिया राबविण्याची आहे.

या प्रक्रियेमधुन गावातील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावांच्या गरजांची निश्चिती व अपेक्षीत उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे हा नियोजनातील महत्वाचा भाग आहे. लोकसहभाग नियोजन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे क्षमता बांधनी प्राशिक्षणाचे कार्यक्रम पंचायत समिती गण, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार असून या निमित्ताने “आमचं गाव आमचा विकास” या उपक्रमा मधुन राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस पुढील पांच वर्षे त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार कामे उपक्रम हाती घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

“आमचं गाव आमचा विकास” हा कार्यक्रमासाठी नियोजित वेळेत व योग्यरित्या व्हावा यासाठी सहाय्यक मार्गदर्शन म्हणून मा. पंकज भोयर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. यवतमाळ, मा. एच. आर. चंदनकर सहाय्यक गटविकास अधिकारी, मा. राजीव शिंदे गटविकास अधिकारी पं. स. दारव्हा, मा. आर. बी. अग्रहरी विस्तार अधिकारी पं .स .दारव्हा, मा. आर. एस. फुटाणे विस्तार अधिकारी पं. स. दारव्हा, श्रीमती वर्षा बोरकर जिल्हा पेसा समन्वयक जि. प. यवतमाळ, श्रीमती. रीता ठवकर प्रविण्य प्राशिक्षक (यशदा), विवेक बोगट प्रविण्य प्राशिक्षक (यशदा), सुदाम पवार प्रविण्य प्राशिक्षक (यशदा), रामदास पाटमासे प्रविण्य प्राशिक्षक (यशदा), जिल्हा परिषद यवतमाळ तसेच पंचायत समिती दारव्हा आदींनी परीश्रम घेतले.

या प्रशिक्षणा बाबत उपस्थित पुरुष, महिला सरपंच यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी या कार्यक्रमात अतिशय मोलाची महीती मिळाली अश्याप्रकारची माहिती यापुर्वी आम्हाला कोणीही दिली नसल्याचे त्यांनी महाराष्ट्र न्युज लाईव्ह च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले आणि आम्ही या प्रशिक्षणामुळे समाधानी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकाच्या मागे मागे फिरत होते आता त्यांना ग्रामसेवकामागे फिरण्याची गरज भासणार नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129