” भारत जोडो यात्रेमध्ये विलासराव देशमुख यांचा फोटो व्हायरल “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेची गेले काही दिवस चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रभरातून भारत जोडो यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यादरम्यानचाच एक फोटो रितेशने ट्वीट केला. या फोटोमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो घेऊन चालताना दिसत आहे. हे पाहून रितेशला अभिमान वाटला. त्याने भावूक होत चक्क हा फोटो ट्वीट केला आहे. रितेशने हा फोटो ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
तुम्ही भारत जोडो यात्रामध्ये कधी सहभागी होणार?, तुम्ही या यात्रेमध्ये दिसत नाही, तुम्हीही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हा असं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे. तर अनेकांनी विलासराव देशमुख तुमची नेहमीच आठवणीत असणार असं म्हटलं आहे.