
” समंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाचा बॅाक्स ॲाफिसवर डंका “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या यशोदा या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. समंथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रदर्शना पूर्वीपासूनच या चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर चांगली कमाई केली आहे. ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी देशभरात ६.३२ कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशीही ४ कोटींच्या पुढे टप्पा गाठला आहे. या चित्रपटाची दोन दिवसांची कमाई १० कोटींपेक्षा अधिक आहे.
दरम्यान, ‘यशोदा’ने प्रदर्शनापूर्वीच ५५ कोटींचा गल्ला जमवला होता. समांथाच्या कारकीर्दीतील हा प्रदर्शनाआधीच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ट्रेड अभ्यासक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली होती.