
“पिंपळखुटा येथे दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘सेवादास – कार्तीक पोर्णीमा’ उत्सव आनंदात साजरा“
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
राम चव्हाण, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामध्ये पिंपळखुटा हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये सर्व जाती धर्मातील लोक राहत असून बहुसंख्य बंजारा समाज आहे. या गावात बंजारा समाजाचे दैवत ‘संत सेवालाल महाराजांचे’ मंदिर स्वातंत्र्यापुर्वी काळापासून आहे. मागील ७० ते ७५ वर्षापासून या गावामध्ये “कार्तिक पोर्णिमेचा” उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या पोर्णीमेला पिंपळखुटा येथील नागरिक “सेवादास पोर्णीमा” या नावाने संबोधतात.
या उत्स्तवात पिंपळखुटा गावातील सर्व जाती धर्माचे लोक तन मन धनाने सहकार्य करतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२२ रोजी हा “सेवादास पोर्णीमेचा” उत्सव साजरा करण्यात आला. दि. ८ नोव्हेंबर रोजी गावातील व बाहेरील पाहुणे मंडळी यांच्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम (नगर भोजन) ठेवण्यात आला होता. दि. ९ नोव्हेंबर रोजी ‘संत सेवालाल महाराजांच्या पगडीची’ घोड्यावरुन मिरवणुक काढण्यात आली.
ही मिरवणुक सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान सेवादास मंदिरा पासुन सुरु झाली. प्रत्येक घरोघरी ‘सेवादास महाराजांच्या पगडीचे’ पुजन केले गेले. मिरवणुक पुर्ण गावात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ४ च्या सुमारास मिरवणूक मंदिरावर परत आली. त्यानंतर मंदिराचे पुजारी श्यामराव चव्हाण महाराज यांच्या हस्ते शेवटची पुजा केली गेली आणि ‘सेवादास महाराजांची पगडी’ परत मंदिरात विधीपुर्वक प्रस्थापित केली गेली.
त्या नंतर ‘संत सेवालाल महाराजांची’ सामुहिक आरती केली गेली. पुजेमध्ये बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य नंगारा व डफडा, टाळ, घंटा या गोष्टीचा समावेश होता. यानंतर पुजा झाल्यावर सगळ्या भावीक भक्तांना प्रसाद देण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पिंपळखुटा गावातील तसेच बाहेर गावावरुन आलेले अनेक भक्तगण यांनी या उत्सवात हजारोंच्या संखेने गर्दी केली. भावीक भक्तांनी ‘सेवादास महाराजांच्या पगडीवर’ तसेच दानपेटीत पैसे दान दिले, यात काही लोकांनी तर चांदीच्या वस्तु देखील दान दिल्या केल्या. तसेच काहींनी गुप्त दान सुध्दा मंदिराला दिले आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री व मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात नुकताच प्रवेश केलेलं मा. संजय देशमुख यांनी सुद्धा या उत्सवात हजेरी लावली. त्यांचा मंदिराच्या विश्वस्तांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच पुजारी श्यामराव चव्हाण महाराज यांचा मा. संजय देशमुख यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
पिंपळखुटा येथील कु. राणी अरुण चव्हाण व कु. सृष्टी जयसिंग राठोड या मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवले. या मुलींचा MBBS साठी नंबर लागल्या कारणाने त्यांच्या मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंदिराची सजावट, साफसफाई करणाऱ्या मुला– मुलींचाही यावेळी मा. दिलीप ना. चव्हाण, मा. धनराज चव्हाण, मा. दुर्गा चव्हाण, मा. रमेश गो. राठोड, मा. वसंता पवार (ग्राम पं. सदस्य), मा. धीरज चव्हाण (नायक) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मंदिरासाठी २००० रुपया पेक्षा जास्त देणगी देणार्यां भाविकांची नावेही जाहीर करण्यात आली. मा. युवराज गं. चव्हाण यांचा सत्कार मा. दुर्गा चव्हाण यांनी केला.
या मंदिरामध्ये जे कोणी महिला, पुरुष आपली मन्नत मागतात ती मन्नत एक वर्षाच्या आत पुर्ण होते अशी भक्तांची धारणा आहे. ज्यांच्या – ज्याच्या अशा अपेक्षा, मन्नत पूर्ण झाल्या अशा बऱ्याच लोकांना यांचा अनुभव सुद्धा आहे.
कार्यक्रमामध्ये मा. किशोर चव्हाण पालत्या यांनी गावाला शिक्षणाबद्दल तसेच गोर बंजारा समाजाबद्दल संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. धनराज चव्हाण यांनी केले. मा. रामधान राठोड, मा. पांडुरंग चव्हाण तसेच सर्व गावकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहकार्य केले.
महाराष्ट्र न्युज लाईव्ह च्या टीम ला इंटरव्हिव देतांना मा. दमडू राठोड, मा. हुकुम चव्हाण, मा. धनराज चव्हाण, मा. मारोती चव्हाण, कु. विठ्ठल चव्हाण, कु. सचिन चव्हाण या लोकांनी बांजारी भाषेमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.