♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयी असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

चंद्रपूर

‘विकासाचा कल्पवृक्ष’ या पुस्तकाच्या ‘स्टोरी टेल अॅप’ ने तयार केलेल्या ‘ऑडिओ बुक’ आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. याप्रसंगी वने तथा सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ‘स्टोरी टेल’ चे भारतातील प्रमुख योगेश दशरथ, मराठी विभागाचे प्रमुख प्रसाद मिरासदार आदी मान्यवर तेथे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्व असते, त्यांच्याच कार्याबाबत पुस्तक प्रकाशित होतात. मंत्री म्हणून मुनगंटीवार यांचे कार्यकर्तृत्व पाहत आलो आहे. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांची अर्थमंत्री म्हणून काम कऱण्याची पद्धतीही जवळून अनुभवली आहे. वनमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांची विधिमंडळ सभागृहातील भाषणे, विषय मांडण्याची हातोटी सर्वांनाच माहित आहे. ते मांडणी करताना अनेक दाखले, आकडेवारीची पोतडीच घेऊन येतात. मंत्रिमंडळ बैठकीतही ते परखडपणे बोलतात. या ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांची ही तळमळ, त्यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यंत पोहचेल, असा विश्वास आहे.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘ऑडिओ बुक’ हे माध्यम शक्तीशाली आहे. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आपला महाराष्ट्र धनसंपन्न होईलच. पण तो गुणसंपन्नही होईल. यासाठी या ऑडिओ बुक संकल्पनेचा वापर करता येईल. हे पुस्तक कीरण कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्यांच्या ‘ऑडिओ बुक’साठी कुणाल आळवे यांनी आवाज दिला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129