” मंडईत विक्रेत्या महिलेला पोलीस शिपायाकडून मारहाण “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
पुण्यातील मंडई परिसरात एका महिलेला किरकोळ कारणावरुन मारहाण केल्या प्रकरणी पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा मंडई परिसरात बांगडी विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी राहुल शिंदे खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आहे.
मंडई चौकीजवळ असलेल्या नळकोंडाळ्याजवळ शिंगेे यांनी दुचाकी लावली. त्या वेळी दुचाकीमुळे अडथळा होतो. नीट दुचाकी लावा, असे शिंगे यांना सांगितले. या कारणावरुन शिंगे यांनी महिलेला बेदम मारहाम केली.या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर तपास करत आहेत.