
” शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील बंगल्यावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी सुमारे आठशे चाहते जमले होते. शाहरुख खान याला पाहण्यासाठी बँडस्टँड येथील मन्नत बंगल्याबाहेर सुमारे आठशे लोक जमले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास खान आपल्या बंगल्याच्या गच्चीत आला आणि त्याच्या चाहत्यांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या. वांद्रे पोलीस ठाण्यातील ४० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर तैनात होते.