” कृषि शास्त्रज्ञ डॉ.सी.डी. मायी यांची वसंतराव नाईक परसबागेला भेट “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
शंकर आडे, नागपुर
कृषी क्षेत्रात डाक्टरेट पदवी प्राप्त. मंत्रालयात आयुक्त ते कृषि विद्यापिठात कुलगुरु पदावर राहून कृषिक्षेत्रात नेत्रदिपक कार्य केलेले व आजही अविरतपणे कृषिक्षेत्रात क्रांतीकारी परिवर्तनासाठी कार्यरत असलेले डॉ.सी.डी. मायी यांची नागपूर स्थित श्रीपतभाऊ राठोड व सौ. जयश्रीताई राठोड द्वारा निर्मित आरोग्यदायी जैविक, “वसंतराव नाईक परसबागेला” भेट देवून समाधान व्यक्त केले.
कु. दिपाली राठोड व कु. अंजली राठोड यांचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण झालेल्या “आरोग्यदायी कुटंब व आरोग्यदायी राष्ट्रनिर्मितीसाठी जैविकशेती” या विषयांवरील सादरीकरण ऐकून भारावून गेले व अॅग्रो व्हिजन द्वारा या विषयांवर विशेष करून खास महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांचा अभ्यासदौरा वसंतराव नाईक परसबाग, मनिष नगर, नागपूर येथे ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
नागपूर येथे होणाऱ्या भारतातील सर्वात मोठया अॅग्रो व्हिजन कार्यक्रमात आणि वनामती येथे खास आयोजित कार्यक्रमात सुद्धा कु. दिपाली राठोड व कु. अंजली राठोड यांचे सादरीकरण करणार असल्याचे आवर्जून सांगितले.
राठोड परिवाराने करित असलेल्या महत्वपूर्ण कार्यासंदर्भात यावेळी मनमोकळी चर्चा केली. मार्गदर्शक आणि दिशादर्शक मार्गदर्शनही केले. याप्रसंगी सत्यक्रांती बायो-अॅग्रो व्हिजन व ज्ञानप्रकाश लोकसंस्थाद्वारा डॉ. सी. डी. मायी यांचे स्वनिर्मित पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.