
” राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहराच्या वतीने पत्रकारांचा सत्कार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
नवी मुंबई
राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहराच्या वतीने पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. भगवानजी ढेबे साहेब विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, मा. शरदजी दडस साहेब हे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मा. मनिषाताई ठाकूर रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा, मा. मुकेश भगत पनवेल तालुका अध्यक्ष, मा. दिपांकी जाधव पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्ष, मा. सौ. माई प्रकाश भाईर सरपंच ग्रा.पं गव्हाण हे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक कळंबोली शहर अध्यक्ष मा. आण्णा वावरे, शहर संघटक मा. पवनकुमार काळे, शहर सचिव देवानंद मोटे, सोशल मिडिया प्रमुख सचिन चव्हाण, काशीलिंग जानकर, शिवाजी खटके, अंकुश दडस, राहुल वाघमोडे, सुदाम चोरमले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. पवन काळे यांनी केले. या सत्कार सोहळ्यात मा. दिलीप ना. चव्हाण संपादक महाराष्ट्र न्युज लाईव्ह, मा. शांता राठोड संपादिका महिलाधार, मा. जयेश जाधव स्थानिक पत्रकार, मा. मयूर तांबडे कळंबोली प्रतिनिधी लोकमत, मा. के. आर. सगणे रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.