
” माझ्या जीवाला धोका – राजन विचारे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
ठाकरे गटाचे समर्थक खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
“ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या जीवाला आणि कुटुंबियांना धोका असल्याची माहिती मला काल मिळाली. तसे पत्र त्यांनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. खरं तर सरकारे येत-जात असतात. लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसाधारण व्यक्ती, प्रत्येकाचं संरक्षण करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे निवडून गेलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या पत्राची दखल घेण्यात यावी, अशी मी विरोधी पक्षनेता या नात्याने मागणी करतो” , अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. “केवळ राजन विचारे नाही, तर इतर कोणालाही अशी शंका असेल, मग कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, राज्य सरकारने त्याकडे लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.