
” पुण्यात अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवली “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
शहरात सोमवारी झालेल्या अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवली. शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. दिवाळी तोंडावर आलेली असताना परतीच्या पावसाने सोमवारी शहराला झोडपले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही तडाखेबंद पाऊस झाला. शहरातील चौकांमध्ये पाणी साचले, रस्त्यांवरून पाणी वाहू लागले, सोसायट्यांच्या तळघरात पाणी साचले. त्यामुळे वाहनांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडले. वाहनांत पाणी गेल्याने त्यात बिघाड होऊन नोकरदारांचा खोळंबा झाला. या वाहनांच्या दुरुस्तीसाठी दिवसभर गॅरेजमध्ये गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.