
” संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
रमेश उर्फ सोनू पवार हे बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र म्हटल्या जाणाऱ्या पोहोरादेवी ते मंत्रालय १७ दिवस चालून आले. गोरधर्माचा – संत सेवालाल महाराजांचा पांढरा झेंडा खांद्यावर घेऊन सोनू पवार आणि औरंगाबाद वरून अरुण राठोड हे दोघेही मंत्रालयात चालत आले. मा. मुख्यमंत्री साहेब हे त्या दिवशी मंत्रालयात नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही.
मा. किसनभाऊ राठोड (गोरधर्म प्रचारक, अध्यक्ष – राष्ट्रीय बंजारा परिषद) यांनी मा. मुख्यमंत्री साहेब यांना स्वतः फोन करून हे लोक ७०० किलोमीटर पायी प्रवास करून तुम्हाला भेटून निवेदन द्यायला आले असे संगीतले. त्या मुलान्काद्डे पूर्ण बंजारा समाजाचे लक्ष आहे असे सांगितले, तेव्हा मुखामंत्र्यानी मी वर्षा बंगल्यावर आहे त्यांना इथे पाठवा मी त्यांना भेटतो असे सांगितले. मुख्यमंत्री साहेबांनी रात्री १.३५ मिनिटांनी त्यांचे निवेदन सन्मानाने घेतले व यावर गांभीर्याने आम्ही लक्ष देऊ अशी हमी दिली.