” अभिनेते रॉबी कॉलट्रेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
‘हॅरी पॉटर’ या चित्रपटात हॅग्रिड हे पात्र साकारणारे अभिनेते रॉबी कॉलट्रेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. ‘हॅरी पॉटर’मधील त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांचा या चित्रपटातील अंदाज आणि विनोदी शैली लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे सगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी ते आपलेसे झाले.
त्यांच्या निधानाच्या बातमीने प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणले. प्रेक्षकांबरोबरच डॅनियल रॅडक्लिफ आणि एमा वॉटसन अशा अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशातच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांचं हॉगवर्ट्सबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.