
” १ नोव्हेंबरपासून वाहन चालकासोबत सहप्रवाश्यांनाही सीटबेल्ट सक्तीचे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९च्या कलम १९४ (ब) (१) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालविल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सहप्रवाशांनाही सुरक्ष बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १ नोव्हेबर,२०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील रस्ते अपघातांचा अभ्यास करून वाहतूक पोलीस मुंबईत विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच हा भाग आहे.