
” राज ठाकरे हे त्यांच्या नातवासोबत शिवाजी पार्क मैदानाच्या कठड्यावर “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या नातवासोबत चक्क शिवाजी पार्क मैदानाच्या कठड्यावर निवांत बसलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज यांनी घेतला होता. तसेच अमित ठाकरेही राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत असून पक्षबांधणीच्या कामात व्यस्त आहेत. आपल्या या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राज यांनी आजोबांची भूमिका पार पाडल्याचं चित्र मुंबईकरांना बुधवारी पहायला मिळालं.
राज हे त्यांचा नातू कियान बरोबर शिवाजी पार्कच्या कठड्यावर बराच वेळ बसून होते. राज यांची सून मिताली तसेच पत्नी शर्मिला ठाकरेही या दोघांबरोबर होत्या. किआन ला पाहण्यासाठी अनेकांनी राज यांच्याभोवती गर्दी केली. अनेकांनी ठाकरे कुटुंबासोबत सेल्फीही काढले. काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थाना वरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. हे निवासस्थानही पूर्वीच्या निवासस्थानाप्रमाणे शिवाजी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.