” टी – २० विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शामीची निवड “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आगामी टी २० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बी.सी.सी.आय.) मोठी घोषणा केली. जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची निवड करण्यात आली. दुखापतीमुळे आधीच भारताला मोठा धक्का बुमराहच्या रूपाने बसला होता आणि शमी देखील कोरोनामुळे आजारी असल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. पण आजारातून बरा झाल्यानंतर त्याने सराव करण्यास सुरुवात केली.
जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात या बातमीने भारतीय संघासोबतच चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. मोहम्मद शामी याने मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एन.सी.ए) म्हणजेच एन.सी.ए. मध्ये फिटनेस चाचणी पास केली होती. बुधवारी १२ ऑक्टोबरला मोहम्मद शामी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.