
” मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही – नारायण राणें “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी आज शुक्रवार दि. १४/१०/२०२२ रोजी दक्षिण मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी सुरू केलेल्या ‘लोकसभा प्रवास’ या संकल्पनेबाबत माहिती दिली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती.
नारायण राणे म्हणाले, ‘लोकसभा प्रवास’ ही भाजपाची नवीन आहे. ज्या मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपाचा पराभव झाला अशा देशभरातील १४४ जागा आहेत, त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ देऊन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिथला खासदार भाजपाचा व्हावा, म्हणून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी हा प्रवास आहे. तो प्रवास करत मी दक्षिण गोव्यावरून दक्षिण मुंबईत आलोय, हा माझा दुसरा दिवस आहे.” “दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार आणि मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.” असे राणे यांनी म्हटले.