
” पुण्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
दुपार नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला शुक्रवारी झोडपले. जोरदार झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरां मधील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील मध्यभागासह सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, बावधन, पाषाण, औंध, मगरपट्टा, नगर रस्ता, कोंढवा, शिवाजीनगर आदी भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. हवामान विभागाकडून शहर व परिसरात पुढील दोन दिवस पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.