
” जे.एस.पी.एम महाविद्यालयात सफाई कामगाराने केला तरुणीचा विनयभंग “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
पुण्यातील जेएसपीएम कॉलेजमधील सफाई कामगाराने २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी येथे जेएसपीएम कॉलेजमधील फार्मसी विभागाच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या शौचालयाची बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास एक ३० वर्षीय व्यक्ती साफ सफाई करत होता. तेवढ्यात २४ वर्षीय तरुणी तिथे जाताच, सफाई करणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने त्याला विरोध करून तेथून पळ काढला. त्यानंतर ही घटना तिने तिच्या सहकार्यांना सांगितली.
या सगळ्या प्रकारानंतर पीडित तरुणीने सफाई कामगारा विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.