
” मुंबई येथील नौदलातील अभियंताने तरूणीवर केला बलात्कार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आयएनएस तुनीर, कारंजा येथे २०२० मध्ये पी़डित तरूणी कुटुंबासह राहत होती. त्यावेळी आरोपी असलेला २९ वर्षीय नौदल कर्मचारी आयएनएस तुनीरमध्ये कार्यरत होता. त्यांची मैत्री झाली होती. मात्र, ही बाब आरोपीच्या पत्नीला समजल्यानंतर तिने तरूणीला पतीशी न बोलण्यास, त्याच्याशी कोणत्याही स्वरूपात संपर्क न ठेवण्यास सांगितले. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये तरूणी नेव्ही नगर, कफ परेड येथे राहायला आली होती. तरूणी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी २.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना तिला आरोपी नवीन नेव्ही नगरजवळ भेटला. तरूणी आरोपीला भेटण्यासाठी त्याच्या सरकारी निवासस्थानी गेली.
आरोपीची पत्नी गावी गेल्याने तो घरी एकटाच होता. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरूणीला दुचाकीवरून अश्विनी रुग्णालयाजवळ सोडले. आरोपी हा भारतीय नौदलात अभियंता आहे. तसेच, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.