
” मराठी चित्रपटांना फार मोठा संघर्ष करावा लागतो – रितेश देशमुख “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
“महाराष्ट्र राज्य सिनेसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण अनेक हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत मराठी चित्रपटांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पहिली पसंती देताना दिसतात. त्यामुळे एकाच राज्यात हिंदी चित्रपटांबरोबर स्पर्धेत टिकून राहणे हे मराठी चित्रपटासांठी फार कठीण आहे. अनेक चांगल्या मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळत असल्याने त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही याचा परिणाम होतो असे रितेश देशमुख यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
यावेळी तो म्हणाला, “मला दिग्दर्शन क्षेत्राचे अनेक वर्षांपासून आकर्षण होते. पण मी अभिनय करत असल्यामुळे ते करण्याचे धाडस मला होत नव्हते. पण गेल्या तीन-चार वर्षांत मी ते करु शकतो का? मला ते जमेल का याबद्दल मी विचार केला. त्यानंतर मी वेड हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरवले.”
नागराज मंजुळेंचा सैराट, महेश मांजरेकरांना नटसम्राट यासारखे अनेक मराठी चित्रपट सुपरिहट झाले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी राज्याला दरवर्षी किमान दोन चांगले मराठी चित्रपट निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. यामागे आपण तिसऱ्या वरुन दुसऱ्या आणि दुसऱ्या वरुन समान पातळीवर कसे जाऊ शकतो याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आपण प्रेक्षकांना कशाप्रकारे आकर्षित करु शकू याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यातील ९ ते १० कोटी प्रेक्षक हे मराठी भाषिक आहेत, असा मला ठाम विश्वास आहे”, असे रितेश देशमुख म्हणाला.