
” राष्ट्रीय समाज पक्षाचे पनवेल महानगर पालिका येथे दि. 13/10/2022 ला आमरण उपोषण “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
नवी मुंबई
गुरुवार दिनांक 13.10.2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने पनवेल महानगरपालिके विरोधात बेमुदत आमरण उपोषण घेण्यात येत आहे.
गा. अण्णा वावरे कळंबोली (शहर अध्यक्ष), मा. रामशेत जरग, जेष्ठ नेते मा. पवन काळे (मुवा नेते), मा. सुधाकर गोयकर (युवा नेते), मा. शरद बढ़स (प्रदेश अध्यक्षा विद्यार्थी आघाडी), मा. भगवान ढेबे (सदस्य महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी), मा. देवानंद मोटे (शहर सचिव), मा. ऋषिकेश जरग व मा. सचिन चव्हाण सोशल मीडया प्रमुख या सर्वांच्या नेत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण घेण्यात येत आहे.
जो पर्यंत आमच्या जनहिताच्या मागण्या महानगरपालिका पूर्ण करणार नाही तो पर्यंत उपोषण चालू राहिल, तरी सर्व जनतेला विनंती आहे आपन सर्वानी मिळून सहभाग घ्यावा आणि आपला हा लढा यशस्वी करावा असे आवाहन या निवेदानामधून जनतेला करण्यात आले.
* राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख मागण्या *
१) कोरोगा काळातील घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णता माफ करा.
२) महानगर पालिके अंतर्गत येणारे रस्ते, पथदिये, गटारे ,सांडपानी, उद्यान यांची कामे पूर्ण करा.
३) 2022-2023 चालू वर्षाचे घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये 50% सूट जाहीर करा.