
” आरोग्य विभागात अकाऊंटीबिलिटी गरजेची आहे – देवेंद्र फडणवीस “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईच्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले आरोग्य विभागात अकाऊंटीबिलिटी गरजेची आहे. सरकार बदललंय अकाऊंटीबिलिटी ठरली पाहिजे. प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही.
शिस्तबद्ध पद्धतीने आणि कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर करवाई करणारे आणि कोणताही राजकीय पक्ष असो दबाव आणल्यास त्यांना नियमांचा पाढा शिकवणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख. ते राजकीय पक्षांना आवडत नसले तरी जनतेमध्ये त्यांची क्रेझ वेगळीच. नागपुरातील त्यांची कारकीर्द चांगलीच वादळी आणि तेवढीच वादग्रस्त राहिली होता. तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईच्या भूमिकेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाष्य केलं आहे. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, “प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॉर्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी.”
दरम्यान तुकाराम मुंढे आता आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक झाले आहेत. त्यामुळे या विभागात आता अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीचे सत्र सुरु होणार, असे बोलले जात आहे.