” राम मंदिराचं ५० टक्के काम पूर्ण – योगी “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
अयोध्येतील राम मंदिराचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तर मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय २०२० मध्ये सुरू झालेले मंदिराचे काम २०२४ च्या शेवटापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पावनधाम श्री पंचखंड पीठाच्या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ जयपूर येथे आले होते, यावेळी त्यांनी राम मंदिराच्या कामाबाबत माहिती दिली.