
” सलमान खानची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’ने दुसऱ्याच दिवशी नॉमिनेशन टास्क देत स्पर्धकांना सरप्राइज दिलं. आता वीकेंएडला स्पर्धकांची शाळा घेणाऱ्या सलमान खान थेट ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार आहे. कलर्स वाहिनीने येणाऱ्या एपिसोडमधील भागाचा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. प्रोमोमध्ये सलमान खान ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेताना दिसत आहे. यामुळे बिग बॉसने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.
परंतु, सलमान खान स्पर्धक म्हणून नाही, तर ‘वीकेंएड का वार’साठी ‘बिग बॉस’च्या घरात जाणार आहे. घरातील सदस्यांबरोबर तो गप्पा मारून त्यांची शाळा घेताना दिसणार आहे. आधीच्या पर्वात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ‘वीकेंएड का वार’मध्ये सलमान खान स्पर्धकांची शाळा घ्यायचा. या पर्वापासून मात्र आठवड्यातील शुक्रवार आणि शनिवार यादिवशी ‘वीकेंएड का वार’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.