” संजय दत्तने गांधी जयंतीच्या निमित्ताने मुन्नाभाई चित्रपटातील ‘तो’ सीन केला शेअर “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता संजय दत्त याने ‘लगे राहो मुंन्नाभाई’ या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. ‘लगे राहो मुंन्नाभाई’ या चित्रपटात मुन्नाभाई या पात्राला महात्मा गांधी दिसत असतात. ते त्याला आपल्या विचारातून समस्येचे निवारण करण्यास सांगत असतात. या चित्रपटातील एक सीन अभिनेता संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात सुरक्षारक्षक मुन्नाच्या कानशिलात लगवतो, त्यावर मुन्नादेखील त्याला त्याच्या पद्धतीत उत्तर देतो. या व्हिडीओला ‘Happy Gandhi Jayanti to all’ असा कॅप्शन दिला आहे.