
” वेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
वेदान्त-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेलाही मुकावं लागलं आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी क्ले आहे.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणारा वेदांन्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं होतं. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील एक लाख रोजगार बुडाल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला होता. यानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.