
” शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला – पंतप्रधानांची घोषणा “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला देण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. या वेळी ते म्हणाले की, २८ सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी होणार आहे. त्या दिवशी ‘अमृत महोत्सव’चा महत्त्वाचा दिवस येत आहे. या जयंतीदिनापूर्वी या महान क्रांतिकारकाला अभिवादन म्हणून, चंडीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, या संवादात भाजपचे नेते आणि विचारवंत दीनदयाळ उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहताना मोदी म्हणाले, की ते एक प्रगल्भ विचारवंत आणि देशाचे महान पुत्र होते.