
” जॅकलीन फर्नांडिसला २०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.
२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.