
” ‘शिवप्रताप गरुडझेप’चा ट्रेलर प्रदर्शित “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडीं पैकी ‘आग्र्याहून सुटका’ हा महत्त्वपूर्ण कालखंड पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे.