
” भारताने तिसऱ्या T-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
भारताने तिसऱ्या आणि निर्णायक T-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली. आधी मोहाली येथील पहिल्या सामन्यात रोहितने कार्तिकचा गळा धरण्यापासून ते अंतिम सामन्यात रोहितने कार्तिकचे कौतुक करून किस करण्यापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागपूर येथील दुसऱ्या गेममध्येसुद्धा रोहित तुफान बॅटिंग करताना नॉन स्ट्रायकरवर असलेल्या दिनेश कार्तिकचे कौतुक करण्यास विसरला नाही. इतकेच नव्हे तर कालच्या विजयानंतरही रोहितने केलेली एक कृती त्याच्या व दिनेश कार्तिकच्या मैत्रीची साक्ष देते.
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-१ अशी फरकाने जिंकली. यानंतर रोहितने संघासह फोटो काढताना विजयी ट्रॉफी कार्तिकच्या हाती दिली. रोहित सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला की, संघातील वेगवेगळ्या खेळाडूंनी पुढे जाणे, प्रगती करणे एक संघ म्हणून सर्वांच्या हिताचे असते. T20 मध्ये आम्ही सुधारणेच्या प्रत्येक संधीचा वापर केला आहे अजूनही बरीच सुधारणा होणे बाकी आहे. पण एका तगड्या संघाविरुद्ध विश्रांतीनंतर पुनरागमन करणे सोपे नाही.”