” आश्रम शाळेतील १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबले “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
गोंदिया
गोंदिया तालुक्यातील शासकीय आदिवासी शाळा, मजितपूर येथील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींना एकाच ट्रकमध्ये तिरोडा तालुक्यातील कोयलारी आश्रम शाळेत खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नेण्यात आले होते. तिथून रात्री उशिरा परत येत असताना श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि ट्रकमध्ये गोंधळ उडाला. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, एकोडी येथे दाखल करण्यात आले आहे.
तीन मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आश्रम शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खरंतर आश्रम शाळा प्रशासनाने त्यांना ने-आन करण्याकरिता इतर सोईस्कर साधनाची व्यवस्था करायला हवी होती. त्यांना ट्रकमध्ये कोंबून नेण्यापूर्वी विचार करायला हवा होता, असे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.