
” नरेंद्र मोदी देशाचे नव्हे, भाजपचे पंतप्रधान – नाना पटोले “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अमरावती
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, ते फक्त भाजपचे पंतप्रधान आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी बेटी बचाव बेटी पढाओ’ असे म्हणण्याऐवजी ‘बेटी पटावो’ असा उल्लेख मागे केला होता. आम्ही त्यावर वादळ निर्माण करू शकलो नाही, पण अशा वक्तव्यातून महिलांबद्दल, मुलींबद्दल भाजपची भावना कशाप्रकारची आहे, हे दिसून येते.